बुलडाणा दि. 25- लोणार तालुक्यात झालेल्या अतिवृष्टमुळे जी हानी झाली त्याबाबत लगेच पिकांचे व घरांचे प्राथमिक सर्वेक्षण व पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्री व राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहे.
24 जुलै रोजी लोणार तालुक्यात 15 तासांमध्ये 419 मिमी. पाऊस झाला. या पावसाने असंख्य ठिकाणी पाणी शेतात घुसले त्याच प्रमाणे शेतीचे आणि घरादारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यात एका युवकाचा पुरात मृत्यू देखील झाला. या सर्व घटनांची माहिती पालकमंत्री या नात्याने हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाकडून घेतल्यानंतर हे निर्देश दिले.
या भागात शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले. पुराचे पाणी उतरल्यानंतर पिकांचे तात्काळ पंचनामे करण्यात यावे, अशा सुचना पालकमंत्र्यांनी दिल्या. पंचनामे झाल्यानंतर शासन नियमाप्रमाणे सर्व बाधितांना तसेच मयत झालेल्या व्यक्तींच्या कुटूंबांना तात्काळ मदत देण्याच्या सुचनादेखील पालकमंत्री महोदयांनी प्रशासनाला दिल्या.
दरम्यान या अतिवृष्टीमुळे झालेल्या परिस्थितीबाबत जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांना लोणार तालुक्याला भेट देवून तेथील परिस्थितीची पाहणी केली व संबधित खात्यांच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. त्यांच्या या पहाणी दौऱ्यात उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी व इतर अधिकारी सहभागी झाले हजर होते.
**********
भविष्य निर्वाह निधी वर्गणीदारांनी वार्षिक लेखाविवरण पत्रे कार्यालयातून घ्यावीत
बुलडाणा दि.25
– भविष्य निर्वाह निधी वर्गणीदारांची 2012-13 ची वार्षिक लेखा विवरण पत्रे,
प्रधान महालेखाकार, मुंबई कार्यालयाकडून वर्गणीदारांना देण्याकरिता राज्याच्या
संबंधित आहरण व संवितरण कार्यालयाकडे पाठविण्यात आलेली आहेत. तरी वर्गणीदारांनी
आपली विवरणपत्रे आपल्या कार्यालयातून घ्यावीत. या वार्षिक लेखा विवरणपत्रात जर
काही त्रुटी असतील तसेच मिसिंग क्रेडिट/डेबिट दर्शविले असेल, तर त्याचे विवरण व
ज्या वर्गणीदारांची जन्मतारीख तसेच नियुक्तीची तारीख विवरण पत्रात नमूद केली नसेल
तर त्यांचा तपशील संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांमार्फत त्वरीत प्रधान
महालेखाकार कार्यालयात द्यावा. म्हणजे त्यात योग्य त्या सुधारणा करुन देणे सोयीचे
होईल. भविष्य निर्वाह निधीची विवरण पत्रे ऑक्टोबर 2013 पासून इंटरनेटवर
वर्गणीदारांच्या सोयीसाठी उपलब्ध असतील सदर वेबसाईटचा पत्ता http:/agmaha.cag.gov.in
असा आहे.
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान 343 ग्रामपंचायती अ प्रतवारीत
बुलडाणा दि.25 – राज्याच्या ग्रामीण भागात सन
2000-01 पासून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. दिनांक 15
सप्टें 2008 चे शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद मतदार बुलडाणा संघस्तरीय मुल्यमापानावरुन ग्रामपंचायतींची अ,ब,व क प्रतवारी ठरविण्यात
आली आहे.
पंचायत समिती एकूण ग्रा.पं. 66 असुन अ
प्रतवारी 21, ब प्रतवारी 47, क प्रतवारी निरंक, चिखली ग्रा.पं 98, 21 अ,44 ब, क निरंक,
देऊळगावजरा ग्रामपंचायत समिती 48, अ-23, ब-09, सिंदखेडराजा ग्रा.पं.स.79 अ-34,
ब 29 , मेहकर ग्रा.पं.स. 98, अ 48, ब 38, लोणार ग्रा.पं.59, अ प्रतवारी 14, 46 ब, क प्रतवारी निरंक, खामगांव ग्रा.पं.
96, अ प्रतवारी 20, ब प्रतवारी 21, क प्रतवारी 01, शेगांव ग्रा.पं. 47, अ प्रतवारी
07, ब प्रतवारी 05, क प्रतवारी 01, जळगांव जामोद ग्रा.पं. 47, अ प्रतवारी
17, ब प्रतवारी 10, क प्रतवारी 01, संग्रामपूर ग्रा.पं. 51, अ प्रतवारी 48, ब
प्रतवारी 03, क निरंक, नांदुरा ग्रा.पं. 65, अ प्रतवारी 29, ब प्रतवारी 22,क
प्रतवारी निरंक, मलकापूर ग्रा.पं 48,अ प्रतवारी 14, ब प्रतवारी 30, क प्रतवारी
निरंक, मोताळा ग्रा.पं. 66, अ प्रतवारी 47, ब प्रतवारी 13, क प्रतवारी निरंक. जिल्हयातील 868 ग्रामपंचायती
पैकी 343 अ प्रतवारी व 317 व ब प्रतवारीत असुन 3क प्रतवारीमध्ये आहेत.
अ प्रतवारी मध्ये आलेल्या ग्रा.पं.
त्यांचा दर्जा कायम ठेवून इतर ग्रामपंचायतींना प्रोत्साहित करावयाचे आहे. ब
प्रतवारीमध्ये आलेल्या ग्रामपंचायतींनी अ-प्रतवारीमध्ये येण्यासाठी तसेच क
प्रतवारी मध्ये आलेल्या ग्रामपंचायती हया अ प्रतवारीमध्ये येण्याचे दृष्टिने
ग्रामस्थ/ ग्रामपंचायतींनी विशेष लक्ष देवून सहकार्य करण्याचे आवाहन अध्यक्ष
जिल्हा परिषद बुलडाणा वर्षाताई सुरेश वनारे,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद
बुलडाणा ओमप्रकाश देशमुख यांनी केले आहे
खर्रा मावा तत्सम मिश्रणावर बंदीची अधिसूचना जारी
बुलडाणा दि. 25- लोकांच्या आरोग्यास हानी करणाऱ्या पदार्थांवर
बंदी अंतर्गत गुटखा, पान मसाला यांच्या सोबत सुपारी आणि सुगंधी तंबाखू यांचे
मिश्रण असलेल्या खर्रा, मावा वा तत्सम सर्व प्रकारच्या साहित्यावर बंदी घालण्याची
अधिसूचना जारी झाली आहे.
महाराष्ट्र शासन
राजपत्र दिनांक 18 जुलै 2013 नुसार जी एकतर स्वादिष्ट, सुगंधीत किंवा कोणत्याही
उक्त्ा अपमिश्रकासोबत मिसळवली जाते आणि अन्न नावाने चालणारी किंवा गुटखा,
पानमसाला स्वादिष्ट,सुगंधीत तंबाखू, स्वादिष्ट, सुगंधीत सुपारी, खर्रा या स्वरुपात
किंवा अन्य कोणत्याही नावाने संबोधली जाणारी किंवा कसे, ग्राहकाने मिश्रण करण्यात
सहजरित्या सुलभ होईल अश्या रितीने विकलेले व वितरीत केलेली एक उत्पादन म्हणून
किंवा निराळे उत्पादन म्हणून आवेष्टीत केलेली किंवा खुले असेलेली आणि विकलेली किंवा
कसे अशी तंबाखू आणि सुपारी यांची निर्मिती, साठवण, वितरण किंवा विक्री यास लोकांच्या
आरोग्याच्या हितासाठी 20 जुलै 2013 पासून 1
वर्षाच्या कालावधीसाठी प्रतिबंधाचे आदेश जारी केलेले आहेत.
मागील वर्षी
गुटखाबंदी झाल्यानंतर वर्षभराच्या काळात अन्न व औषध प्रशासन, बुलडाणा कार्यालयाने
गुटखा, पान मसाला व तत्सम अन्न पदर्थांवरील प्रतिबंधीत आदेशाची प्रभावीपणे
अंमलबजावणी केलेली असून मागील गेल्या वर्षभरात गुटखा, पान मसाला व तत्सम
तंबाखूजन्य अन्न पदार्थाच्या कालावधीत बुलडाणा कार्यालयामार्फत 357 पेढीची तपासणी
करण्यात आली.
43 पेढातून
गुटखा, पान मसाला व तत्सम तंबाखूजन्य अन्न पदार्थ यांचा 4238 पाऊच व 6196 पॅकेट्स
एकूण किंमत रु 6,48,187/- एवढा साठा जप्त करण्यात आला असून रु 2,44,438/- एवढया
किंमतीचा साठा नष्ट करण्यात आला आहे.
सदर प्रकरणापैकी
11 प्रकरणात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच 35 प्रकरणात
न्यायालयात खटले दाखल करण्यास्तव अन्न
सुरक्षा आयुक्त, मुंबई यांना प्रस्ताव सादर करण्यात आले असून 10 प्रकरणात खटला
दाखल करण्याचे मंजुरी आदेश प्राप्त झाले असुन सर्व प्रकरणांत खटले दाखल करण्यात
आलेले आहेत, उर्वरीत प्रकरणात खटले दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. असे सहाय्यक
आयुक्त मा.रा. घोसलवाड यांनी कळविले आहे.
*****
No comments:
Post a Comment